Monday, February 25, 2008

सोबती ...


नमस्कार
मित्रहो ,

एका ठरविक वेळी, प्रत्येकाच्या आयुष्यात कोणीतरी "स्पेशल" येत असते ..... कायमची सोबत देण्यासाठी . किम्बहुना प्रत्येकाला एक आशा असते कि एखाद्या त्याने / तिने आपल्या आयुष्यात यावे आणि अन आपल्या बरोबरीने चालावे. आपले सोबती व्हावे. ती व्यक्ती यायला अजुन अवकाश असतो पण आपल्याला त्या व्यक्तिचा इतका ध्यास लागतो की मग त्या ्यक्तिची नकळत स्वप्नही पडू लागतात. आणि मग त्या व्यक्तिला , त्या सोबतीला आपण सतत बोलवू लागतो ....... स्वप्नातून प्रत्यक्शात !

हो ना ?


अबोल आहे आजला मी
शब्द मोजके देऊन जा
अंतरातल्या भावनेला
शब्दात नेमके गुन्फ़ून जा .....

स्वप्नात पाहतो रोज तुजला
प्रत्यक्श एकदा येऊन जा
देईन सोबत कायमची तुज
वचन एवढे घेऊन जा .....

येशील तु हे निश्चित आहे
वेळकाळ मज सान्गून जा
तिष्टतो तुजसाठी निरंतर
गुपित एवढे जाणून जा .....


- सचिन

1 comment:

Sneha said...

kyaa baat hai?
yeyil sachin ti lavakarch..my best wishes is with u...
aani ho blog world madye aapala saharsh swagat aahe... :)