Thursday, February 28, 2008

सोबत आहे ... तूच नाही

शब्द आहे सूर नाही
काव्य आहे मैफ़ल नाही

अश्रू आहे ओघ नाही
श्वास आहे हुन्कार नाही

दिवस आहे सूर्य नाही
रात्र आहे चन्द्र नाही

दिवा आहे तेल नाही
वात आहे ज्योत नाही

वाट आहे वळण नाही
सोबत आहे ... तूच नाही .


- सचिन

No comments: