Monday, April 28, 2008

काही चारोळ्या .....

मी म्हणत नाही तुला
की आज तू जशी आहेस अगदी तशीच रहा आयुष्यभर
पण एवढ मात्र नक्की सान्गेन
माझं प्रेम तुझ्यावरचं कमी होणार नाही तसूभर !!

=====================***

तूच सान्ग तू झोपल्याशिवाय
मी तुझ्या स्वप्नात कसा येऊ ?
तू आकंठ जागी असताना
मी माझा दिवा तरी कसा मालवू ?

=====================***

आजही मी अंधारातच
काल होतो जिथे ...
ना एक पाऊल पुढे ना एक पाऊल मागे
अजुनही थडग्यासारखा थिजलेला तिथेच !

=====================***

बहरलेल्या झाडवर एकदा
एक कळी उमलली,
नि दुसर्‍या फुलान्चा बहर पाहता पाहता
ती स्वत:हाचं फुलणच विसरुन गेली !

=====================***

तुझ्या अवतीभवतीच गुम्फलाय
आता माझा प्रत्येक क्षण,
मी हसतो, मी बोलतो
माझ्या जगण्याचेही तूच कारण !

=====================***